मुंबईला पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

मुंबई - 'ऑक्‍टोबर हिट'ने वैतागलेल्या मुंबईकरांना शुक्रवारी दुपारी परतीच्या पावसाने झोडपले. ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या अनेक भागांत जोरदार ते मध्यम पाऊस झाला.

मुंबई - 'ऑक्‍टोबर हिट'ने वैतागलेल्या मुंबईकरांना शुक्रवारी दुपारी परतीच्या पावसाने झोडपले. ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या अनेक भागांत जोरदार ते मध्यम पाऊस झाला.

दुपारी साडेतीनच्या सुमारास अंधारून आले. काही वेळेतच ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजा चमकू लागल्या आणि पाऊस सुरू झाला. यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. साधारणत: अर्धा तास पाऊस पडला. दक्षिण मुंबईसह सायन, कुर्ला, पवई, दादर, गोरेगावमध्ये पावसाचा जोर जास्त होता.

Web Title: mumbai news rain