नवी मुंबईत "रॅली फॉर रिव्हर' 

नवी मुंबईत "रॅली फॉर रिव्हर' 

नवी मुंबई - देशातील नद्यांकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात फार मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागेल, असे भाकित इशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्‌गुरू जग्गी वासुदेव यांनी केले आहे. देशातील नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी व जलसंपत्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी इशा फाऊंडेशन व केंद्र सरकारच्या वतीने कन्याकुमारी ते हिमालय अशी भारतभ्रमण "रॅली फॉर रिव्हर'चे आयोजन केले आहे. या रॅलीचे शनिवारी नवी मुंबईत आगमन झाले. महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, सभागृहनेते जयवंत सुतार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण आदींनी तिचे स्वागत केले. 

आपल्या देशाला नैसर्गिक समृद्धी लाभली असून भारतात दर वर्षी 40 ते 45 टक्के पावसाचे पाणी नियोजनाअभावी वाहून जाते. काही भागात पाणी अडवण्याचे प्रयत्न केले जातात; मात्र त्या ठिकाणी महापूर येतो. त्यामुळे पावसाळ्यात ओला व नंतर सुका दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पाण्याचे जतन व जलसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी "रॅली फॉर रिव्हर'चे आयोजन केले असल्याचे सदगुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितले. यात कन्याकुमारी ते हिमालयापर्यंतच्या राज्यांतील दुर्लक्षित नद्या पुनरुज्जीवित करण्याविषयी जनजागृतीवर भर दिला जाणार आहे, असे फाऊंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 8000980009 या क्रमांकावर मिस कॉल देऊन या अभियानात सहभाग नोंदवू शकता, असे इशा फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. नवी मुंबईत येणाऱ्या इशा फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांसाठी महापालिका मुख्यालयाच्या ऍम्फीथिएटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ढोल-ताशांच्या गजरात, तुतारीच्या निनादात आणि लेझीम पथकासह विद्यार्थ्यांनी "रॅली फॉर रिव्हर'चे स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com