आमदार रमेश कदम यांना शिवीगाळप्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - सहायक पोलिस निरीक्षकाला शिवीगाळ केल्या प्रकरणी आमदार रमेश कदम यांना अखेर बुधवारी पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

कदम यांना उपचारांकरिता ऑर्थर रोड तुरुंगातून जे. जे. रुग्णालयात नेण्यात येत होते. त्या वेळी पोलिसांची गाडी येण्यास उशीर झाल्याने कदम चालत निघाले. सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी कदम यांना थांबण्याची विनंती केली असता त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. चौकशी पूर्ण झाल्यावर कदम यांच्याविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला होता. बुधवारी त्यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने एक दिवसाची कोठडी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.