ज्येष्ठ नाट्य समीक्षक रमेश उदारे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मुंबई - ज्येष्ठ पत्रकार, नाट्य समीक्षक व लेखक रमेश उदारे (वय 67) यांचे रविवारी पहाटे 6 वाजता त्यांच्या टिळकनगर येथील घरी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून उदारे काम करत होते. ते अनेक वर्तमानपत्रांमध्ये नाट्य समीक्षण करत असत. 25 वर्षे ते हे काम करत होते. नाट्य संमेलन, साहित्य, नाट्यविषयक कार्यक्रमांना ते उपस्थित राहयचे. नाट्यविषयक, व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकांची निर्मितीही त्यांनी केली आहे. नाट्य समीक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या वि. स. खांडेकर नाट्य समीक्षा पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. "पावलो पावली', "मंतरलेली माणसे', "आठवणींची पाऊलवाट', "लग्नकल्लोळ', "फ फजितीचा', "साहित्य सहवास', लग्न गोंधळ, "फिल्मी चक्कर', "ऋणानुबंध', "निंबोणीच्या झाडामागे' ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.