खारघरमधील धार्मिक स्थळ जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

खारघर (मुंबई): खारघर वसाहतीमधील सिडकोच्या भूखंडांवरील धार्मिक स्थळांवर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आणि पोलिसांनी आज (सोमवार) कारवाई केली. दुपार तीन पर्यंत 9 मंदिरे पाडण्यात आली. एकूण सोळा धार्मिक स्थळांवर दिवसभरात कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

खारघर (मुंबई): खारघर वसाहतीमधील सिडकोच्या भूखंडांवरील धार्मिक स्थळांवर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आणि पोलिसांनी आज (सोमवार) कारवाई केली. दुपार तीन पर्यंत 9 मंदिरे पाडण्यात आली. एकूण सोळा धार्मिक स्थळांवर दिवसभरात कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

खारघर वसाहतीमध्ये सिडकोच्या भूखंडावर सेक्टर तीस मधील मदरसा, सेक्टर बारा मधील मशीद, सत्संत ट्रस्ट व शनिमंदिर, साई मंदिर, दुर्गा मंदिर, सेक्टर अकरा मधील महाकाली, संत तुकोबाराय, शनिमंदिर, सेक्टर पंधरा मधील गणेश वाटिका, साई गणेश मंदिर, मुर्बी गावातील मंदिराचे चौथरे, पेठ गावातील दत्त मंदिर आणि सेक्टर पाच मधील आई माता आणि औंदुबर मंदिर अश्या जवळपास सोळा मंदिरा सोमवारी तोडण्यात येणार असल्यामुळे सर्व पक्षीयांनी रविवारी खारघर बंद केले होते. तर मंदिर रक्षक समितीची गठीत करून कारवाईच्या विरोधात जेलभरो आंदोलनचे पत्र खारघर पोलिसांना देण्यात आले होते. कारवाई करताना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी जवळपास दोनशे पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. मात्र, कारवाईच्या वेळी संबधित मंदिराच्या एक-दोन कार्यकर्ता वगळता पोलिस कारवाईच्या भीतीपोटी सर्व नेते मंडळी भूमिगत झाले होते. सिडकोने प्रथम सेक्टर अकरा मधील साई मंदिर, महाकाली मंदिर भूससपाट केले. मात्र, दहा फुटावर राम मंदिरावर कारवाई करू नये म्हणून काही महिला भजन करीत बसल्या होत्या. अधिकाऱ्यांनी महाकाली मंदिर जमीनदोस्त करून काही अंतरावर असलेल्या शनिमंदिरावर कारवाई करताना, संतापलेल्या गुरुनाथ गायकर आणि गुरुनाथ पाटील यांनी राम मंदिरावर अधिकारी कारवाई टाळत असल्याचा आरोप करून अधिकाऱ्याच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. सेक्टर अकरा नंतर सेक्टर पंधरा मधील साई गणेश आणि सेक्टर तीस मधील मदरसा पाडण्यात आले. दिवसभरात ऐकून नऊ मंदिर पाडण्यात आले.

अखेर राम मंदिर जमीन दोस्त
सेक्टर अकरा मधील महाकाली मंदिरावर कारवाई करून शेजारी असलेल्या राम मंदिरावर कारवाई न करताच अधिकारी थेट ओवा गाव गाठल्याने अधिकारी दुट्टपी करीत असल्याचा आरोप करून गुरुनाथ पाटील यांनी थेट सिडकोचे व्यस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडे तक्रार केल्यावर अखेर अतिक्रमण पथकाने सायंकाळी चार वाजता राम मंदिर जमीन दोस्त केला. तर मुर्बी आणि ओवा पेठ गावातील येथील ग्रामस्थांच्या मंदिरावर कारवाई होणार असल्यामुळे ग्रामस्थांना मध्ये नाराजी पसरली होती. मात्र, सदर मात्र सिडकोकडून कारवाई न झाल्याने ग्रामस्था मध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

सिडकोकडून भाजप पक्षासी संबधित असलेल्या मंदिरावर थातूर मातुर कारवाई करण्यात आली. लवकरच या विषयी बैठक घेऊन सिडकोच्या विरोधात आंदोलन केले जाईल.
- गुरुनाथ गायकर, नगरसेवक शेकाप

काही मंदिर दोन हजार नऊ पूर्वीची असल्यामुळे कारवाई टाळण्यात आली आहे. मात्र, उर्वरित मंदिरावर दुसऱ्या टप्यात कारवाई केली जाईल.कारवाई करताना कोणताही पक्ष भेद न बाळगता कारवाई करण्यात आली.
- दीपक जोगी, सहाय्यक अनधिकृत बांधकाम नियत्रण अधिकरी सिडको.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :