'नॅक' न मिळण्याची जबाबदारी कुलगुरूंवर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाला "नॅक'चे मानांकन मिळण्यासाठी कुचराई करण्याची जबाबदारी विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्यावर निश्‍चित केली जाणार आहे. राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती सी. विद्यासागर राव यांच्यामार्फत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे संकेत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधान परिषदेत मंगळवारी दिली.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाला यंदा "नॅक'चे नामांकनही मिळालेले नाही. शैक्षणिक संस्थांच्या राष्ट्रीय नामांकन यादीत स्थान मिळविण्यासाठी करण्यात येणारी "नॅक' मूल्यांकनाची प्रक्रिया पारदर्शक आणि सुटसुटीत आहे. मात्र ती मिळविण्यासाठी अर्ज करण्याची वेळ निघून गेली होती, अशी माहितीही वायकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिली.