डेडलाइन संपली... रिक्षा चालकाविरोधात दंडात्मक कारवाई

डेडलाइन संपली... रिक्षा चालकाविरोधात दंडात्मक कारवाई

कल्याण : ठाणे पाठोपाठ कल्याण डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात भाड़े नाकारणे, वाढीव भाड़े घेणे , प्रवासी वर्गाला मारहाण , महिलांची छेड़छाड़ , विनय भंग प्रकार वाढल्याने नागरिकांचा रिक्षा चालका विरोधात संतापचे वातावरण निर्माण झाले होते यावर तोड़गा म्हणून वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालक आणि टैक्सी चालकांनी आपल्या वाहनात मालक आणि चालकांची सविस्तर माहिती देण्याच्या सूचना दिल्या होत्या , त्याची डेडलाइन संपल्याने आज सोमवार ता 10 जुलै सकाळ पासून रिक्षा आणि टैक्सी चालकाविरोधात धड़क कारवाई करण्यात आली दुपारी 1 वाजता 50 हुन अधिक रिक्षा चालका विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ती पुढे सुरु राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे . 

ठाणे पाठोपाठ  कल्याण डोंबिवली शहरी ग्रामीण भागात रिक्षाची संख्या वाढत असून , त्यात प्रति दिन रिक्षा चालक हे गणवेश न घालणे, लायसन्स नसणे, वाढीव भाड़े घेणे, प्रवासी वर्गाशी सुट्टे पैश्यावरुन हुज्जत घालणे, प्रवासी वर्गाला मारहाण प्रकार वाढत असताना आता महिलाची छेड़छाड़ आणि विनयभंग प्रकार वाढल्याने प्रवासी वर्गात रिक्षा चालकाविरोधात संतापचे वातावरण होते तर मागील आठवड्यात प्रवासी संघटना आणि भाजपा महिला पदाधिकारी यांनी पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे आणि वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांची भेट घेवून मुजोर आणि बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात कारवाईची मागणी केली होती. दरम्यान रिक्षा चालका विरोधात तक्रारी पाहता त्यावर तोड़गा काढण्यासाठी कल्याण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी रिक्षा टैक्सी चालक आणि मालक संघटना पदाधिकारी वर्गाची बैठक घेवून 15 दिवसाची मुदत दिली होती, शहरातील ऑटो रिक्षा - टैक्सी यांच्या डायव्हर सीटच्या मागे नामफलक लावण्याचे आदेश देण्यात आले होते त्याची डेडलाइन रविवार 9 जुलै रोजी संपल्याने आज सोमवार 10 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्या पासून वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या पथकाने कल्याण मध्ये रिक्षा विरोधात धड़क कारवाई केली 50 हुन अधिक रिक्षा चालकांनी आपली माहिती न लावल्याने त्यांच्या कडून पाचशे रुपये दंड वसूल केला यामुळे बेशिस्त रिक्षा चालकांचे चांगलेच धाबे दनानले  आहेत . 

रिक्षा चालकाना मुदत दिली होती, त्यांनी आपली माहिती लावणे बंधन कारक होते. मात्र त्याची ज्या रिक्षा टैक्सी चालकांनी अंमलबजावणी केली नाही. त्यांच्या विरोधात आज सोमवार 10 जुलै पासून कारवाई सुरु झाली असून पुढील आदेश येई पर्यंत ही कारवाई सुरु राहणार आहे, ज्यांना फार्म मिळाले नाही त्यांनी वाहतुक शाखे कडून घेवून जावे , प्रवासी वर्गाला प्रवास करताना अड़चन आल्यास हेल्प लाइन वर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन कल्याण वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी केले आहे.

प्रवासी वर्गाला टैक्सी आणि रिक्षा प्रवास करण्यास अड़चन निर्माण झाल्यास खालील मदत घ्यावी.

पोलिस मदत क्रमांक 100, महिला हेल्प लाईन क्रमांक  103 , पोलिस मदत 8286300300 आणि 8286400400 

तर आरटीओ मुंबई हेल्प लाइन नंबर 1800220110 तर ठाणे आरटीओ हेल्प लाईन नंबर 18002255335 आदी नंबर जाहीर करण्यात आले असून प्रवासी वर्गाने यावर आपली तक्रार करू शकता असे  वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com