रोडपालीमध्ये राहा बिनधास्त!

रोडपालीमध्ये राहा बिनधास्त!

नवी मुंबई - पनवेल महापालिका हद्दीत असलेले रोडपाली शहर अल्पावधीतच विकसित झालेला एकमेव नोड म्हणून नावारूपास आले आहे. नावाजलेल्या विकसकांनी उभ्या केलेल्या उंचच उंच इमारती पाहून रोडपाली नोडच्या विकासाची व्याप्ती लक्षात येते. हाकेच्या अंतरावर मुंबई-पुणे, मुंबई-गोवा आणि ठाणे-पनवेल मार्ग असल्याने कनेक्‍टिव्हिटीच्या दृष्टीने रोडपाली शहर सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.

कधी काळी फक्त एका गावापुरता मर्यादित असलेला रोडपाली नोड आता झपाट्याने झालेल्या विकासामुळे शहराकडे वाटचाल करीत आहे. रोडपाली गावात सिडकोच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईतील नामांकित विकसकांनी तिकडे मोर्चा वळवला. मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या. चांगल्या व दर्जेदार सुविधा पुरवतानाच खरेदी केले जाणारे घर ग्राहकांच्या आवाक्‍यात ठेवण्याचे भान विकसकांनी ठेवल्याने रोडपाली शहर विकसित होत गेले.

कळंबोलीतील नवीन सेक्‍टर ८ ईपासून सेक्‍टर २० पर्यंत रोडपाली परिसरात एकूण २४ सेक्‍टर आहेत. साडेपाचपासून सात हजारांपर्यंत चौरस फुटांपर्यंतच्या दरात तिथे घरे उपलब्ध आहेत. चार ते सातमजली इमारतींत २८ ते ३३ लाखांपर्यंत वन रूम किचनची घरे सहज मिळतात. काही विकसकांनी काही घरांना छोटी बाल्कनीही देऊ केली आहे. 

रोडपाली नोडमध्ये रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा महापालिकेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. बांधकाम परवानगी महापालिकेकडून मिळत असल्याने विकसकांबाबत खातरजमा करता येणे शक्‍य आहे. रोडपाली नोड कळंबोलीजवळ असल्यामुळे सर्वांत लवकर विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक आहे. सध्याच्या परिस्थितीत रोडपालीमध्ये ८०० इमारती उभ्या आहेत. त्यात अंदाजे तब्बल अडीच हजार घरे तयार होत आहेत. सध्या रोडपाली नोडची लोकसंख्या सात हजारने वाढली आहे.

रोडपाली नोड राहण्यासाठी सर्वोत्तम शहर आहे. तिथून फारच कमी वेळात रहिवाशांना मुंबई, पुणे, अलिबाग, रोहा, खोपोली, लोणावळा, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी शहरांमध्ये जाणे शक्‍य आहे. बेस्ट आणि एनएमएमटी बस सेवेमुळे वाहतुकीचा चांगला पर्याय उपलब्ध आहे.
- विजय पटेल  (आनंद बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स)

रोडपाली शहरातील सध्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातील आहेत. आताच गुंतवणूक केली तर काही वर्षांत त्याचे चांगला परतावा मिळू शकतो. रोडपालीत आताच गुंतवणूक करा.
- रोहित पटेल   (ॲरमस रिॲलिटी)

रोडपाली शहरात सर्वसामान्यांसाठी वन-आरकेपासून ते टू-बीएचके घरे उपलब्ध आहेत. अनेक बॅंकांचे गृह कर्जही सहज मिळते. ज्यांना घरखरेदीसाठी गृहकर्जाची गरज आहे अशांसाठी रोडपाली नोडमध्ये बॅंक तत्काळ कर्ज उपलब्ध करत आहे.
- अब्दुल रहमान दादन   (दादन एंटरप्रायजेस)

४५ ते ५० लाखांत वन-बीएचके
सात ते १४ मजली इमारतींत ६५० ते ६८० चौरस फुटांपर्यंतची वन-बीएचके घरे ३५ ते ४२ लाख व जास्तीत जास्त ५५ लाखांत उपलब्ध आहेत. २० ते २५ मजली इमारतींमध्ये ९८० ते ११८० चौरस फुटांपर्यंतचे टू-बीएचके फ्लॅटस्‌ उपलब्ध आहेत. त्यासाठी मात्र ६० ते ८० लाख किंवा जास्तीत जास्त एक कोटी मोजावे लागतील. १२०० ते १३०० चौरस फुटांपर्यंतच्या थ्री-बीएचके सदनिका एक ते सव्वाकोटी किमतीत उपलब्ध आहेत. 

सर्वाधिक संकुले
रोडपाली शहर कळंबोलीमध्ये विकसित झाल्याने सर्वाधिक विकसकांनी रहिवासी संकुले उभी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे रोडपालीमध्ये एकट्या इमारती व उंच टॉवरऐवजी पाचच्या समूहाने असलेली संकुले उभी राहिली आहेत. रोडपालीत सर्वांत मोठा नीलसिद्धी अमरंते यांचा ९७५ सदनिका व ४० व्यावसायिक गाळे असणारा संकुल आहे. त्यात अनेक नामांकित कंपन्यांच्या शोरूम, मोठ्या बॅंका, पॉश रेस्टॉरंटस्‌ आदी स्वरूपाची दुकानेही आली आहेत... येत आहेत.

 सुखसोईंनी संपन्न राहणीमान
रोडपाली नोड दोन्ही महामार्गांलगत असल्यामुळे तिथे सर्व प्रकारच्या सोई उपलब्ध आहेत. रोडपालीत सध्या डी-मार्ट व्यापारी संकुल सुरू आहे. बेस्टच्या बसची सुविधा कळंबोली व रोडपालीपर्यंत मिळते. रोडपालीजवळ असलेल्या कळंबोली शहरात एमजीएम कॉलेज-रुग्णालयासह इतरही अद्ययावत रुग्णालये आहेत. सीबीएसईच्या धर्तीवर अनेक शैक्षणिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com