सैफच्या सिनेमाचे चित्रीकरण साहित्य जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

मुंबई - महापालिकेची परवानगी न घेता परळ येथील एका मैदानावर ठेवलेले सिनेमाच्या चित्रीकरणाचे साहित्य शुक्रवारी (ता. 9) जप्त करण्यात आले.

मुंबई - महापालिकेची परवानगी न घेता परळ येथील एका मैदानावर ठेवलेले सिनेमाच्या चित्रीकरणाचे साहित्य शुक्रवारी (ता. 9) जप्त करण्यात आले.

सैफ अली खानच्या सिनेमाचे चित्रीकरण परळ येथील एका इमारतीत सुरू होते. चित्रीकरणाचे सर्व साहित्य सेंट झेव्हियर्स मैदानात बेकायदा ठेवण्यात आले होते. हे मैदान महापालिकेने मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनला देखभालीसाठी दिले आहे. सैफ अली खानच्या व्हॅनेटी व्हॅनसह इतर अनेक वाहने मैदानात उभी करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात येताच पालिकेने जप्तीची कारवाई सुरू केली. चित्रीकरणाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने सामान तत्काळ हलवण्याची हमी दिल्यावर ही कारवाई थांबवण्यात आली. पालिकेची परवानगी नसल्याने नियमांनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सहायक आयुक्त विश्‍वास मोटे यांनी सांगितले.