मुंबईः प्लास्टिक मुक्तिसाठी 'सकाळ'च्या आवाहनास यश

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबईः दक्षिण मुंबईतील सर्वात उंच 18 फुटांची आई जगदंबेची मूर्ती महिला भाविक भक्तांच्या आकर्षणाची केंद्र बिंदू ठरत आहे. 55 वे वर्ष यशस्वीपणे दुर्गा महोत्सव साजरा करणारे चिराबाजार ताड़वाडी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या येथील मंडपात स्थानापन्न झालेली चतुर्भुजा भालप्रदेशी रुधीर मळवट धारण केलेली प्रसन्न मुर्ती पाहताच आनंद होतो. सिहासनावर विराजमान असलेल्या देवीच्या मुख कमलावरील तेजोमय प्रभा भक्तांच्या दृष्टिस पडताच एक विलोभनिय आनंदाची आणि प्रसन्नतेची छटा चेहऱ्यावर उमटते त्याच वेळी श्रद्धेने भाविक देवी चरणी नतमस्तक होतात.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष अमेय खानविलकर, सेक्रेटरी अमित भाद्रीचा, सदस्य सतीश मसानी, अविनाश कनोजीया सौरभ बने यांनी सकाळ माध्यमाच्या पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिक मुक्त वसुंधरा मोहिमेस सहकार्य करीत पर्यावरण प्रिय सजावट केलेली असून, कोठेही प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता घेत आपले पर्यावरण संरक्षणा चे कर्तव्य पार पाडले आहे. मंडळाने देवीची नऊ दिवस उपासना-आराधना, उपवास करणाऱ्या महिला भक्तांसाठी खास कापडी पिशव्यांचे वाटप केले. सांस्कृतिक कार्यक्रमात प्लास्टिक मुक्तीचा संदेश आम्ही प्रामुख्याने देऊ, असे मंडळाने घोषित केलेले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news sakal and plastic ban