सकाळ-मधुरांगणच्या मनोरंजनाने भारावल्या सैनिक पत्नी आणि मुले

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सैनिक हो तुमच्या साठी... च्या गिताने उपस्थितांच्या चेहऱ्यावर ओघळले अश्रू

मुंबई : वर्षभर आपले कुटुंबिय आणि देशासाठी लढणाऱ्या आपल्या पती राजांची आणि कुटुंबियांची सक्षम पणे सांभाळ करणाऱ्या त्या पत्नी रूपी आदिशक्तिचा गौरव करण्यासाठी त्यांनाही थोडा विरंगुळा मिळावा आणि मनोरंजना बरोबरच 'ती' चे ही अन्य सैनिक पत्नी समवेत गेट टुगेदर व्हावे या उदात्त हेतुने आर्मी वाईफ वेल्फेयर असोसिएशन (awwa) यांच्या तर्फे क्लोजिंग डे निमित्त कुलाबा येथे सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.

सैनिक हो तुमच्या साठी... च्या गिताने उपस्थितांच्या चेहऱ्यावर ओघळले अश्रू

मुंबई : वर्षभर आपले कुटुंबिय आणि देशासाठी लढणाऱ्या आपल्या पती राजांची आणि कुटुंबियांची सक्षम पणे सांभाळ करणाऱ्या त्या पत्नी रूपी आदिशक्तिचा गौरव करण्यासाठी त्यांनाही थोडा विरंगुळा मिळावा आणि मनोरंजना बरोबरच 'ती' चे ही अन्य सैनिक पत्नी समवेत गेट टुगेदर व्हावे या उदात्त हेतुने आर्मी वाईफ वेल्फेयर असोसिएशन (awwa) यांच्या तर्फे क्लोजिंग डे निमित्त कुलाबा येथे सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.

'अव्वा' तर्फे खास 'सकाळ' माध्यमाच्या 'मधुरांगण'ला सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास आमंत्रित करण्यात आले होते. त्याला कारणही तसेच होते. ते सकाळ माध्यमाची जनमानसात असलेली विश्वसनीयता आणि लोकप्रियता यांचा प्रभाव असल्याने सकाळ माध्यमाला आमंत्रित केले होते. तसे पाहता आर्मी आपल्या कार्यक्रमांना प्रसिद्धी माध्यमांना शक्यतो दुरच ठेवते पण त्यास अपवाद झालाय तो सकाळ माध्यम-मधुरांगणाचा. टीम 'मधुरांगण'ने आषाढी दिंडी सोहळा करताच सभागृहातील सैनिक पत्नी आणि बच्चे कंपनीने जनुकाही आपलाही यात सहभागी आहोत अशा श्रद्धेने पांडुरंगाला वंदन केले.

मधुरांगण टीमने महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातून सुरुवात करताना महाराष्ट्राचा ग्रामीण भाग, द्वार तुलसी पूजन, वासुदेवाचे प्रकटने, नित्यकर्मे शेती नांगरट, कोळी नृत्य, लावणी, झिम्मा-फुगडी, लाटने नृत्य, सासू-सुनेची जुगलबंदी, फुगडी, गणेशोत्सवातील गीत नृत्ये सादर केली. कला कारांचा नृत्याविष्कार आणि अभिनयाने कार्यक्रमास रंगत आली. त्यात रंगून सैनिक पत्नी मंत्रमुग्ध झाल्या.

भारतीय नागरिकांचा घास अडतो ओठी, सैनिक हो तुमच्या साठी... या गिताने आणि त्यातील कलाकारांच्या कारुण्यमय अभिनयाने युद्धस्थ परिस्थितीत पती-बाबा हे कर्तव्यावर असताना आपल्या जीवाची होणारी घालमेल प्रत्यक्ष अनुभवलेल्या सैनिक पत्नी आणि मुलांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. तर काहींच्या नयनांतून अश्रू वाहिले.

जेव्हा हाती तिरंगा घेत नृत्य सादर झाले त्या वेळी भारत मातेच्या या वीर कन्यांना पाहुन सभागृहात उपस्थितात एक नव चैतन्य आले. मुखांतुन भारत माताकी जय असा जय घोष दुमदुमला टाळ्यांचा कड़कडाट झाला. विविध विषयांतील शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केलेल्या सैनिकांच्या मुला मुलींचा स्मृती चिन्ह देत गुणगौरव करण्यात आला.

तत्पूर्वी, सकाळी सव्वा दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली. अर्चिता भट्टाचार्य यांनी त्यांच्या टीमसह देशभक्तिपर स्फुरण गीते गात कार्यक्रमाला सुरुवात केली. 'अव्वा' च्या पदाधिका-यांनी अर्चितासह 'सकाळ' माध्यमाचे आणि मधुरांगणचे खास कौतुक केले. आर्मी वाईफ वेल्फेयर असोसिएशन सह हेल्थ ऑर्गनाइजेशनने आयोजित केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमास आर्मी ऑफिसर्स आणि त्यांच्या पत्नींचे मार्गदर्शन लाभले. हेल्थ इंस्पेक्टर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सैनिक पत्नी समोर मधुरांगणने सादर केलेल्या सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमाने आम्हाला आनंद वाटला. सैनिकां प्रती असलेले प्रेम यातून वृद्धिंगत झाले. यशस्वी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करीत यशाचा आलेख चढता ठेवावा.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
'प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार, जीवनाचा अविभाज्य घटक- सर्वोच्च न्यायालय
मोहर्रम असल्याने दुर्गा विसर्जनास परवानगी नाही: ममता बॅनर्जी
गौराईचं कौतुकच न्यारं... गौरी गणपतीच्या गाण्यांचा खजिना
ज्येष्ठांच्या पुढाकाराने सरला शिवारातला दुष्काळ
परभणी: कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याची अात्महत्या
सर केले तीन गड
तांदूळ, तीळ, मोहरीवर लिहिले सात ग्रंथ
कऱ्हाड: अठरा नख्यांचे कासव आढळले मृत अवस्थेत
बीड: चोरट्यांनी फोडली पोलिस ठाण्याजवळील सहा दुकाने
आजही 'ती' पुन्हा बिघडली; मेढा आगाराचा भोंगळ कारभार
प्लांट टिशू कल्चर लॅब’ सुरू होण्यापूर्वीच रद्द
ग्रामपंचायत करणार रस्त्यावर फलक लावून दारू विक्री
गवताचा बाप्पा आशीर्वादासाठी सज्ज!