रोजंदारी कामगारांना "बेस्ट'ची वेतनवाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मुंबई - "बेस्ट' उपक्रमातील विद्युत विभागात रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या वेतनात तीन हजार 400 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नोव्हेंबरपासून या कामगारांना किमान मासिक वेतन म्हणून 15 हजार 309 रुपये मिळतील.

याचबरोबर तीन महिन्यांत सर्व कामगारांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय बेस्ट समिती अध्यक्षांच्या दालनात नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आधी या कामगारांना किमान वेतन मिळत नव्हते. 240 दिवस काम केलेल्या कामगारांना सेवेत सामावून घेणे बंधनकारक आहे. असे असूनही दहा वर्षांपासून काम करणाऱ्या या कामगारांना सेवेत सामावून घेतले जात नव्हते. यासाठी कामगारांनी 16 ऑक्‍टोबरपासून वडाळा आगारासमोर धरणे आंदोलन केले.