सायन्स एक्‍स्प्रेसची उत्सुकता!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

मुंबई - वातावरण प्रणालीचे ज्ञान, तापमानवाढ, अनियमित मॉन्सून, निसर्ग संरक्षण आदी माहिती देणारे प्रदर्शन बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये दाखल झालेल्या ‘सायन्स एक्‍स्प्रेस’मध्ये पाहता येणार आहे. यंदा सायन्स एक्‍स्प्रेसचे नववे वर्ष असून, ‘जलवायू परिवर्तन’ विषयावरील बरीच माहिती त्यात आहे.

प्रदर्शनाचे उद्‌घाटन बुधवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नवी दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आले. शनिवारपर्यंत (ता. २२) सीएसटीतील फलाट क्रमांक दहावर सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत एक्स्प्रेस उभी राहील. 

ऑक्‍टोबर २०१७ पासून सायन्स एक्‍स्प्रेसचे भारतभ्रमण सुरू झाले. १६ डब्यांच्या वातानुकूलित ट्रेनने आतापर्यंत १ लाख ५६ हजार किलोमीटर प्रवास केला आहे. बुधवारी सकाळपासून शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रदर्शन पाहिले. दिवसभरात तीन हजारांहून अधिक जणांनी एक्स्प्रेसला भेट दिली.