विज्ञानाच्या गळचेपीविरुद्ध आज वैज्ञानिकांचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई - विज्ञानाच्या गळचेपीविरुद्ध आणि देशात विज्ञानासाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी बुधवारी (ता. 9) ऑगस्ट क्रांती मैदान ते विल्सन कॉलेजपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई - विज्ञानाच्या गळचेपीविरुद्ध आणि देशात विज्ञानासाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी बुधवारी (ता. 9) ऑगस्ट क्रांती मैदान ते विल्सन कॉलेजपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोर्चा दुपारी 3.30 वाजता निघेल. देशभरात विविध ठिकाणांहून मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील मोर्चात 500 हून अधिक वैज्ञानिक सहभागी होतील, असा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला.
मागे पडू लागलेली वैज्ञानिक विचारसरणी, अवैज्ञानिक गोष्टींचा प्रचार, ऑनर किलिंग, विज्ञान संस्थांच्या निधीत केलेली कपात, वाढती धार्मिक असहिष्णुता या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी यांना एकत्र येण्याचे आवाहन ब्रेक थ्रू फाऊंडेशनने केले आहे. शिक्षणात विज्ञाननिष्ठ संकल्पनांनाच स्थान द्यावे, विज्ञान तंत्रज्ञान संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तीन टक्के तरतूद व शिक्षणासाठी 10 टक्के तरतूद करावी, अशा मागण्याही फाऊंडेशनने केल्या आहेत.

उद्या मराठा मोर्चा असला तरी या मोर्चावर त्याचा काही परिणाम होणार नाही. मराठा मोर्चा सकाळी असून आमचा मोर्चा दुपारी आहे.

विज्ञाननिष्ठ वातावरण हवे असलेला प्रत्येक जण या मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभागी होईल, अशी अपेक्षा मुंबईचे संयोजक अनिकेत सुळे यांनी व्यक्त केली.