सेल्फीच्या नादात तरुणाचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई - सेल्फी काढण्याच्या नादात 18 वर्षांच्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी वरळी सी फेस येथे घडली. योगेश बुद्धाप्पा गवळी असे त्याचे नाव आहे. वरळी येथील सिद्धार्थनगरमध्ये राहणारा योगेश मित्रांसह सी फेसवर गेला होता. सेल्फी काढण्यासाठी तो समुद्रात उतरला; मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. एका मोठ्या लाटेबरोबर तो समुद्रात ओढला गेला. बचाव पथकाने रात्री उशिरा त्याला समुद्रातून बाहेर काढले. त्याला नजीकच्या रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्‍टरांनी योगेशला मृत घोषित केले. या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.