राज्य सहकारी संघाचा गुरुवारी शताब्दी महोत्सव

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मुंबई - राज्य सहकारी संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य सहकारी संघ आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक या सहकार क्षेत्रातील दोन शिखर संस्थांतर्फे गुरुवारी (ता. 5) मुंबईत शताब्दी महोत्सव होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन होईल.

राज्यातील सहकार चळवळीला नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचे पूरक पाठबळ मिळावे, या हेतूने राज्य सहकारी संघ राज्यात सक्रिय आहे. संस्कारक्षम कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याबरोबरच त्यांना सहकार क्षेत्रातील कायदे व कामकाज पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते. कार्यकर्त्यांनी एकत्र यावे आणि पारदर्शक व संस्कारक्षम संस्थांची उभारणी करावी. त्यातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास व समृद्धीचा लाभ पोचवावा, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्यानुसार राज्य सहकारी संघाचा शताब्दी महोत्सव होणार आहे, असे आयोजक आणि मुंबई बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले.