'रूफ टॉप पोलिसी' अखेर अमलात, शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

Bayview-Restaurant
Bayview-Restaurant

मुंबई : मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.  मुंबईच्या समुद्रकिनारी अनेक हाँटेल्स असून त्यांच्या टेरेसवर उपहारगृह सुरू करण्याची मागणी शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिकेकडे केली होती.  टेरेसवर असलेले अनेक हॉटेल्स बंद पडल्यामुळे अनेक तरुणांचे रोजगार बुडाले असून, पुन्हा या तरुणांना रोजगार मिळावा या हेतुने हॉटेल्स चालु व्हावे अशी मागणी वारंवार युवा सेने कडुन करण्यात येत होती.
 
महापालिका आयुक्तांनी टेरेसवरील उपहारगृहांना मंजूरी देण्यासाठी सुधारित ‘रुफ टॉप पॉलिसी’ प्रसिद्ध केली आहे.  या धोरणात फक्त व्यावसायिक इमारती, लॉजिंग-बोर्डींगची सोय असलेले  हॉटेल्स, मॉलच्या टेरेसवरचे उपहारगृह सुरू करता येणार आहे.  मात्र टेरेसवर एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर करून खाद्यपदार्थ शिजवता येणार नाही, अशा काही अटी या धोरणात आहेत.  हे धोरण २ नोव्हेंबर २०१७, गुरुवारपासून अमलात आणण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.  शिवनेने सतत केलेल्या पाठपुराव्याला पालिका प्रशासनाने अखेर मंजुरी दिली आहे.
 
तीन वर्षे रखडलेल्या प्रस्तावाला अखेर मंजुरी

आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफ आणि टेरेसवरील उपहारगृहांना मान्यता देण्याची मागणी पालिकेकडे केली होती.  आदित्य ठाकरे यांनी केलेल्या मागणीच्या संकल्पनेला भाजपाचा विरोध होता.  त्यानुसार सन २०१४ मध्ये पालिकेने 'रुफ टॉप'ची पॉलिसी आणली होती.  मात्र भाजप, मनसेने विरोध केल्यामुळे ह्या प्रस्तावाला सुधार समितीची व पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली नव्हती, त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता.  मुंबईत टेरेसवरील अनेक हॉटेल्स बंद पडले असून हजारो तरूणांचे रोजगार बुडाले असल्याचा दावा सेनेने केला होता.  याबाबत प्रशासनाने सुधारित धोरण तयार केले होते.  या धोरणेला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी स्वतःच्या अधिकारात प्रशासकीय मंजूरी दिली असून त्याची अमलबजावणी करण्याबाबतचे आदेशही दिले आहेत. 
 
स्थानिकांना रोजगार मिळणे हा उद्देश 

मुंबईत अनेक पर्यटन स्थळे आहेत.  त्यामुळे पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी, समुद्रकिनाऱ्याचे आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक मुंबईत येत असतात. त्यामुळे समुद्र किनारी असलेले टेरेस हॉटल्स चालु केल्यास पर्यटकांना चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार मिळेल.  शिवाय पालिकेचा महसूल वाढण्याबरोबरच पर्यटकही आकर्षित होतील, यामुळे पालिकेने या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी शिवसेनेची मागणी होती. अखेर सतत पाठपुरावा केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
 
टेरेसवर हॉटेल्स सुरू करण्यासाठीची नियमावली

 
* व्यावसायिक इमारती, लॉजिंग बोर्डींगची व्यवस्था असलेली हॉटेल्स, मॉलच्या टेरेस यांवर उपहारगृह सुरू करता येणार आहे.
* टेरेसवर एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर करून खाद्यपदार्थ शिजवता येणार नाही. (मायक्रोवेव्ह, इंडक्शन कुकींगलाच परवानगी) 
* छत्री, पत्रे अशा कोणत्याही पद्धतीने टेरेस झाकता येणार नाही.
* पावसाळ्यात मान्सून शेड लावता येणार नाही. 
* शेजारच्या इमारतींना आवाजाचा त्रास होता कामा नये. 
* पोलिसांच्या नियमानुसार आणि पालिकेच्या 'दुकाने व आस्थापना अधिनियमानुसार' ठरवून दिलेल्या वेळेपर्यंतच हे हॉटेल्स चालवता येणार.
* आग प्रतिबंधक यंत्रणा बसवून अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक.
* नियमांचा भंग केल्यास कोणत्याही नोटीसीशिवाय परवानगी रद्द केली जाणार.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुदीप दिलीप नाईक यांनी म्हटले आहे की,
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांच्या पाठपुरावठ्या मुळे मुंबई महापालिकेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.पर्यटन आणि स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com