मुंबई पालिकेत शिवसेना सध्या "सेफ झोन'मध्ये 

मुंबई पालिकेत शिवसेना सध्या "सेफ झोन'मध्ये 

मुंबई - नारायण राणे यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश न केल्यामुळे मुंबईतील राणेसमर्थक नगरसेवक गोंधळात पडले आहेत. राणे भाजपमध्ये गेल्यास त्यांच्याबरोबर पक्ष सोडण्याच्या निर्णयापर्यंत हे सहा नगरसेवक पोचले असल्याचे समजते. यामुळे शिवसेना "सेफ झोन'मध्ये आली आहे. 

नारायण राणे यांच्याबरोबर कॉंग्रेसचा त्याग करण्यासाठी मुंबईतील सहा नगरसेवक तयार होते. राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर या नगरसेवकांनीही राजीनामा दिला असता. भाजपच्या मदतीने पोटनिवडणूक जिंकणे या नगरसेवकांना अवघड नव्हते. राणेंच्या साथीने भाजपमध्ये प्रवेश केल्यावर पक्षात चांगले पद मिळण्याची अपेक्षा त्यांना होती. आता हे नगरसेवक बुचकळ्यात पडले आहेत. 

राणेसमर्थक नगरसेवक तूर्तास कॉंग्रेस सोडत नसल्याने शिवसेना "सेफ झोन'मध्ये आली आहे. भाजपकडे शिवसेनेपेक्षा अवघे चार नगरसेवक कमी आहेत. हे सहा नगरसेवक पोटनिवडणुकीत निवडून आले असते, तर भाजपने मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून लावली असती. 

अपक्ष जिंकून येणे अवघड 
राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता स्वत:चा पक्ष स्थापन केल्यास या नगरसेवकांना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पदाचा राजीनामा देणे अवघड जाईल. स्वत:ची ताकद असली, तरी इतर पक्षांशी लढून अपक्ष म्हणून निवडून येण्याची त्यांना खात्री नाही. 

महापालिकेतील बलाबल 
अपक्षांसह शिवसेनेचे सदस्य - 88 
अपक्षांसह भाजपचे सदस्य - 84

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com