जलवाहिन्यांलगतच्या झोपड्यांबाबत शिवसेनेची जनहित याचिका 

जलवाहिन्यांलगतच्या झोपड्यांबाबत शिवसेनेची जनहित याचिका 

मुंबई - पवई तुंगा व्हिलेज येथील पाईपलाईनलगतच्या झोपड्यांवरील कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी शिवसेनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेची सुनावणी सोमवारी (ता. 20) होणार आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरांत पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांलगत उभारण्यात आलेल्या झोपड्या उच्च न्यायालयाने हटवण्याचे आदेश दिले आहेत. घाटकोपर परीसरातील जलवाहिनीलगतच्या झोपड्यांवरील कारवाईनंतर पवई तुंगा व्हिलेज येथील जलवाहिन्यांचा परिसर मोकळा करण्यासाठी महापालिकेच्या एल विभागाने तेथील झोपडीधारकांना नोटीस बजावली आहे. कारण न्यायालयाने पालिकेला 31 डिसेंबरपर्यंत झोपड्या हटवण्याचे आदेश दिले आहेत. 

साकीनाका प्रभाग 156 मधील मिलिंद नगर, उदय नगर परिसरातील झोपड्यांवर पालिका कारवाई करणार आहे. झोपडीधारकांकडे 2000ची सर्वेक्षण पावती असतानाही शेकडो रहिवाशांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या झोपडीधारकांनी 2000 पूर्वीची कागदपत्रे पालिकेकडे सादर केली आहेत. पालिकेने अनेकांना अपात्र ठरवले आहे. सध्या शाळा सुरू आहेत. त्यामुळे झोपडीधारकांची बाजू समजून घेणे आवश्‍यक असल्याचे याचिकाकर्ते स्वप्नील धुरी यांनी म्हटले आहे. 

येथील झोपडीधारकांचे एचडीआयएल, कुर्ला, कमानी येथे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका अश्विनी अशोक माटेकर यांनी मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com