शिवडी बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार - वायकर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारसोबत बोलणी सुरू असून, या चाळींचा आहे त्या जागेवरच पुनर्विकास करण्यात येईल, अशी ग्वाही गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत दिली.

शिवसेनेच्या अजय चौधरी यांनी याबाबतची चर्चा उपस्थित केली होती. मुंबईतील इतर बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार असताना शिवडी बीडीडी चाळीचा पुनर्विकास होण्याबाबत संभ्रम आहे. या इमारती जुन्या असल्याने येथील जनता जीव मुठीत धरून जगत आहे. केंद्राच्या जमिनीवर या इमारती असल्याने केंद्राकडे सरकारने काय पाठपुरावा केला, असा प्रश्न अजय चौधरी यांनी उपस्थित केला. यावर वायकर म्हणाले, की शिवडी बीडीडी चाळी या केंद्र सरकारच्या म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर आहेत. यामुळे केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांनाही पत्र लिहिले आहे. केंद्राकडून ही जागा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.