दिवाळीत कोपरखैरणेत अंधार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

कोपरखैरणे - सेक्‍टर ५ येथे बुधवारी (ता. १८) रात्री केबलच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुचाकी जळून बेचिराख झाली. यात एक जण जखमी झाला असून त्यामुळे या परिसराचा वीजपुरवठा खंडित होऊन रात्रभर अंधार पसरला होता. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

कोपरखैरणे सेक्‍टर ५ येथील उद्यानानजीक घर क्रमांक १० च्या समोर बुधवारी रात्री १० च्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन केबलला आग लागली. दिवाळीमुळे त्या वेळी तेथे नागरिकांची गर्दी होती. हा प्रकार पाहून त्यांची तारांबळ उडाली. या आगीत एका दुचाकीचे नुकसान झाले. यात एक जण किरकोळ जखमी झाला. याची माहिती मिळताच विद्युत पारेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत आग आटोक्‍यात आली होती. यामुळे परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर केबलच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले, ते दोन-अडीच तास सुरू होते. त्यामुळे येथे अंधार होता.