दीपाली गणोरे हत्याप्रकरणी सिद्धांतला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

मुंबई - पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्या पत्नी दीपाली गणोरे यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा सिद्धांतला वाकोला पोलिसांनी शुक्रवारी (ता. 26) अटक केली. त्याला न्यायालयाने दोन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

थंड डोक्‍याने आई दीपाली यांची हत्या केल्यानंतर सिद्धांत जयपूर आणि नंतर जोधपूरला गेला. मुंबई पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. त्याचा सुगावा लागताच मुंबई पोलिसांनी जोधपूर पोलिसांना त्याची माहिती दिली. त्याला तेथील पोलिसांनी गुरुवारी (ता. 25) एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांनी त्याला शुक्रवारी (ता. 26) पहाटे विमानाने जयपूरहून मुंबईला आणले.

सिद्धांतने आई दीपाली यांच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यांची हत्या केली. घटनास्थळी रक्ताने लिहिलेला "मला पकडा आणि फाशी द्या' असा मजकूर आढळला होता. न्यायालयाने सिद्धांतला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.