सिंघानिया पिता-पुत्र वादावर सामोपचाराने तोडगा काढणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

मुंबई - मालमत्तेच्या वादाबाबत न्यायालयीन दावा दाखल केलेले उद्योगपती विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम हे या वादावर लवकरच सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी चर्चा करणार आहेत, अशी माहिती आज मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.

विजयपत यांनी उच्च न्यायालयात मुलगा गौतम यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. रेमंड लिमिटेडच्या रोख्याबाबत लवादाने दिलेल्या निर्णयावर गौतम यांच्याकडून अंमलबजावणी होत नाही, असे या दाव्यामध्ये म्हटले आहे. मात्र संबंधित प्रकरण व्यक्तिगत असून, त्यावर सामोपचाराने तोडगा काढावा, असा सल्ला न्या. गिरीश कुलकर्णी यांनी दिला होता. त्यानुसार चर्चा करण्याची तयारी आज दोन्ही पक्षकारांच्या वतीने वकिलांनी दर्शविली. याचिकेवर पुढील सुनावणी 11 सप्टेंबरला होणार आहे.