ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठीच्या विशेष अनुदानात वाढ करणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - ग्रामपंचायत कार्यालयासाठी इमारत, दहनभूमी आणि दफनभूमीसाठीची असलेली 10 लाखांची तरतूद वाढविण्यासाठीचा प्रस्ताव नियोजन विभागाला देण्यात आला असून, या संदर्भात पाठपुरावा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत जनसुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येत असलेल्या अनुदानाबाबत सदस्य अमल महाडिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. सदस्य चंद्रदीप नरके, सुभाष साबणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.