वेटरच्या मुलीला ९६ टक्के

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

धारावी - धारावीचे नाव काढले तरी अनेक जण नाक मुरडतात; पण या धारावीत झोपडीवजा खुराड्यात राहणाऱ्या कविता नाडर या वेटरच्या मुलीच्या यशाने आज धारावी उजळून निघाली. कविताने दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवले. कोणतीही शिकवणी न लावता कविताने मिळविलेल्या यशाचे धारावीत कौतुक होत आहे.

अण्णानगरमध्ये कविताचे दहा बाय दहाचे घर. आजूबाजूला पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गोंधळ. त्यामुळे अभ्यास होणेच अवघड. वडील राजगोपाल नाडर हे धारावीच्याच एका टपरीवजा हॉटेलमध्ये वेटर. अशा सर्व संकटांवर मात करत कोणतीही खासगी शिकवणी न लावता, रात्रीचा अभ्यास करून कविताने हे उत्तुंग यश मिळवले. कविताच्या मोठ्या बहिणीने १२ वीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवले आहेत, हे विशेष. तिला ९०च्या आसपास टक्के मिळतील, अशी खात्री शिक्षकांना होती. तिने अपेक्षेपेक्षा जास्त टक्के मिळवले, असे मुख्याध्यापक मायकल राज यांनी सांगितले.