एसटी महामंडळाला आषाढीमुळे मोठे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

मुंबई - आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाने चालवलेल्या जादा गाड्यांमुळे चांगले उत्पन्न मिळाले आहे. तब्बल 16 कोटींचे उत्पन्न मिळवताना प्रवाशांच्या संख्येत दोन लाखांची वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 3 ते 10 जुलैदरम्यान पंढरपूरसाठी एसटी महामंडळाने 3 हजार 527 जादा बस चालवल्या. त्यांच्या 16 हजार 307 फेऱ्या झाल्या.

गतवर्षीपेक्षा जादा बस आणि फेऱ्या चालवल्याने प्रवासी संख्याही दोन लाखांनी वाढली. 2016 मध्ये आषाढी एकादशीला पाच लाख 64 हजार 253 प्रवासी मिळाले. जादा गाड्या चालवतानाच विश्रांती कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय मदत केंद्र, रुग्णवाहिका इत्यादी सुविधाही महामंडळाने दिल्या होत्या.

टॅग्स