कल्याण एसटी डेपोमध्ये कडकडीत बंद; ठिय्या आंदोलन

ST bus
ST bus

कल्याण : कल्याण एसटी डेपोमधील कर्मचारी वर्ग सोमवार मध्यरात्रीपासून संपावर गेल्याने प्रवाशी वर्गाचे चांगलेच हाल झाले. मध्यरात्रीपासून कर्मचारी वर्गाने ठिय्या आंदोलन ही केले. यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्याना ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.

राज्यव्यापी एसटी कर्मचारी वर्ग विविध मागण्यांसाठी संपावर गेले त्याला कल्याण एसटी डेपोमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. कल्याण एसटी डेपोमध्ये चालक 138, वाहक 150 असे एकूण 280 कर्मचारी वर्ग आहेत. तर 68 बसेस असून दिवसभरात 474 फेऱ्या होतात. कल्याण एसटी डेपोमधून ठाणे जिल्हा, माळशेज मार्गे, कसारा मार्गे, कोकणात, एक्सप्रेस हायवे मार्गे, खंडाळा मार्गे, जाणाऱ्या भिंवडी, वाडा, पालघर, पडघा, पनवेल, बेलापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण, अहमदनगर, नाशिक, पुणे, नारायणगाव, जुन्नर, नगर, चिपळूण, रत्नागिरी, शिर्डी, धुळे, मालेगाव आदी मार्गावर मध्यरात्रीपासून एकही बस सुटली नसल्याने प्रवाशी वर्गाचे चांगलेच हाल झाले.

कल्याण एसटी डेपोमधील कामगार संघटना, इंटक संघटना, मनसे कामगार संघटना, मयुको कामगार संघटना, कास्ट्रईब संघटना सभासद, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटनांच्या कर्मचारी आणि पदाधिकारी वर्गाने संपात सहभागी होत निषेध व्यक्त केला. सोमवार मध्यरात्री पासून कल्याण एसटी डेपो मध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र मंगळवारी सकाळी काही आंदोलन कर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. जबरदस्तीने आंदोलन दाबन्याचे काम पोलीस करत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला. 

आमदार नरेंद्र पवार यांनी संप करी कामगारांची भेट घेत समस्या जाणून घेत आगामी हिवाळी विधिमंडळ अधिवेशनमध्ये एसटी कर्मचारी वर्गाचे समस्या मांडणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले. 

प्रवाशी वर्गाची लूटमार ...
एसटी बसेस बंद असल्याने खासगी वाहन चालकांनी अव्वाच्या सव्वा पैसे घेत प्रवाश्यांची लूट केली होती. कल्याण आळेफाटा प्रति 300 रुपये घेऊन लूटमार सुरू होती. तर टॅक्सी , रिक्षा चालकांनी चांगलाच हातसाफ केल्याने प्रवाशी वर्गाचे हाल झाले.

दिवाळी.. ऐन दिवाळीत एसटी बस संपामुळे नागरिकांना पर्याय नसल्याने कल्याण एसटी डेपो मध्ये बसून मनस्ताप सहन करावा लागला .तर कर्मचारी संघटना आणि कर्मचारी वर्ग दिवसभर घोषणा देत होते तर एसटी डेपो मध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त होता .संप कधी मिटतो यावर प्रवासी वर्गाची नजर लागली आहे.

मदतीचा हात 
संपामध्ये सहभागी कर्मचारी वर्गाला तर प्रवासात अडकलेल्या प्रवासी वर्गाला विविध संघटनांनी मदतीचा हात दिला. चहा, नाश्ता, जेवणाची सोय करून मदतीचा हात दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com