मुंबईच्या मुलुंड भागात बिबट्याचा पुन्हा संचार

अक्षय गायकवाड
रविवार, 10 सप्टेंबर 2017

बिबट्याने एका कुत्र्यावर झडप घातली आणि त्याला घेऊन तो जंगलात पसार झाला.

मुलुंड : मुलुंडमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. गेले दोन ते दिवसांपासून मुलुंडच्या टिकवूड अपार्टमेंटमध्ये बिबट्याचा वावर होताना दिसत आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून जवळ असल्याने बिबटे येथे दिसून येत असतात. बिबट्या हा निशाचर प्राणी असल्याने तो रात्रीच जास्त बाहेर पडतो. त्यामुळे या भागात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या मध्ये रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने एकाच कुत्र्यावर झडप घातली आणि त्याला घेऊन तो जंगलात पसार झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गेले काही महिने गायब झालेल्या बिबट्याने पुन्हा शहरांत एन्ट्री केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
आता देताय की जाताय; मराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ
जमिनीच्या वादातून मुलांनीच केला पित्याचा खून
नोटबंदीने देशाची फसवणूक केली : पी. चिदंबरम
राजनाथसिंह काश्‍मीर दौऱ्यावर; मेहबूबा मुफ्तींशी चर्चा
'डेरा'च्या मुख्यालयात फटाक्‍यांचा अवैध कारखाना
स्पर्धा परीक्षांच्या पलीकडं... (संदीप वासलेकर)
मौजा चिंधीमालच्या भिकाऱ्यांचं काय करायचं ? (उत्तम कांबळे)