आमदारांच्या "पीएं'साठी मुंबईत अभ्यासवर्ग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

मुंबई - विधिमंडळाच्या काही अधिवेशनांपासून कामकाजात बरेच बदल झाले आहेत. हे बदल तसेच अधिवेशन काळात आणि कामकाजांच्या संदर्भात ऑनलाइन प्रक्रिया करून तारांकित प्रश्‍न, लक्षवेधी, औचित्य कसे नोंदवावेत याचे प्रशिक्षण आमदारांच्या स्वीय सचिवांना दिले जाणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी 23 जुलैला हा खास अभ्यासवर्ग घेण्यात येईल, असे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

विधानमंडळाच्या कामकाजासंदर्भातील बहुतांश कामे पक्ष कार्यालयाकडूनच केली जातात. मागच्या अधिवेशनातही मोजक्‍या स्वीय सचिवांना हे प्रशिक्षण देण्यात आले होते; पण आता सरसकट सर्व आमदारांच्या स्वीय सचिवांना या अभ्यासवर्गाला हजेरी लावावी लागेल. भाजप आमदारांच्या "पीएं'साठी यापूर्वी "वसंत स्मृती' या भाजपच्या मुंबईतील कार्यालयात अशा प्रकारची शिबिरे घेण्यात आली होती. आता ऑनलाइन कामकाजाचे प्रशिक्षण सर्व "पीएं'ना दिले जाणार आहे. एकीकडे कामे ऑनलाइन करण्याची सक्ती केली जात आहे, तर दुसरीकडे त्याबाबतच्या सोईसुविधा दिल्या जात नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकार अभ्यासवर्गाची सक्ती करत असेल तर तशा सोईसुविधाही द्याव्यात, अशी मागणी "पीएं'नी केली आहे.