शितप बाहेर पडला अन् पाच मिनिटात कोसळली इमारत... (व्हिडिओ)

टीम ई सकाळ
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई : घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आज (शुक्रवार) व्हायरल झाले असून त्या फुटेजनुसार सुनील शितप इमारत कोसळण्यापूर्वी पाच मिनिटे आधी दुर्घटनास्थळावरून बाहेर पडला असल्याचे दिसते आहे.

मुंबई : घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आज (शुक्रवार) व्हायरल झाले असून त्या फुटेजनुसार सुनील शितप इमारत कोसळण्यापूर्वी पाच मिनिटे आधी दुर्घटनास्थळावरून बाहेर पडला असल्याचे दिसते आहे.

साई दर्शन ही घाटकोपरमधील दामोदर पार्कातली 30 वर्षांची जुनी इमारत 25 जुलैला कोसळली होती. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला.

इमारतीच्या तळमजल्यावर सुनील शितप याचे नर्सिंग होम होते. त्याने रुग्णालयाचे नुतनीकरण सुरू केले होते. ते करताना इमारतीच्या तळमजल्याची रचनाच बदलली होती. इमारतीचे पिलर काढून त्या ठिकाणी लोखंडी रॉड बसवल्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे. शितपविरोधात भारतीय दंडविधान कलम 304 (2) (सदोष मनुष्यवध) नुसार गुन्हा दाखल झालेला आहे.

शितप कारमधून बाहेर पडल्यानंतर काही क्षणात साईदर्शन इमारत कोसळल्याचे आणि लोक सैरावरा धावत सुटल्याचे क्लिपमध्ये दिसते आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार 10 वाजून 19 मिनिटांनी शितप बाहेर पडला आणि 10 वाजून 24 मिनिटांनी इमारत कोसळली.

'ई सकाळ'वरील महत्त्वाच्या बातम्या :