जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे राष्ट्रवादीबाहेर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

नेरळ - रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय आज जाहीर केला. तूर्तास टोकरे यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसला, तरी भाजपचे आमंत्रण आले असल्याची कबुली दिली.

ज्येष्ठ नेते वसंत भोईर यांच्यापाठोपाठ सुरेश टोकरे यांनीही कर्जत तालुक्‍याला नवीन चेहरा मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसबाहेर पडत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. या वेळी सिडकोचे माजी संचालक वसंत भोईर, कामगार नेते विजय मिरकुटे उपस्थित होते. काही दिवसांपासून आपल्याविरोधात नेरळ पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी फूस लावली होती. त्यात शिवसेनेचे दोन नेतेही हस्तक्षेप करीत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे टोकरे यांनी जाहीर केले.

Web Title: mumbai news suresh tokare NCP