स्वाईन फ्लूबरोबर मुंबईत लेप्टोचेही रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई - जूनमध्ये मुंबईत स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात. यंदा लेप्टोचे रुग्णही सापडल्याने आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान वाढले आहे. पावसाने जोर पकडल्यापासून मुंबईत लेप्टोचे रुग्ण आढळू लागले आहेत. 

जूनमध्ये लेप्टोच्या सुमारे आठ रुग्णांची महापालिकेच्या रुग्णालयांत नोंदणी झाली. लेप्टोने मृत्यू झाल्याची घटना न घडल्याने आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांनाही मोठा दिलासा वाटत आहे. 15 ते 22 जून दरम्यान स्वाईन फ्लूचे 92 रुग्ण आढळले. या आजाराने तीन जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक गर्भवती महिला आहे. धारावीतील या तरुण महिलेला ताप, खोकला, श्‍वास घ्यायला त्रास होणे, घसा दुखणे अशी लक्षणे दिसत होती. 11 जूनला तिला पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. जानेवारीपासून स्वाईन फ्लूचे 285 रुग्ण आढळले असून त्यातील 16 जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स