कल्याण: तळोजा मेट्रोला पहिल्या टप्प्यात प्राधान्य

सुचिता करमरकर
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मागील वर्षी या प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आले होते. त्यानंतर याचा आराखडा तयार करण्यात आला होता. वर्षावर मंगळवारी झालेल्या बैठकीदरम्यान पुन्हा या विषयांतर चर्चा झाली.

कल्याण : तळोजामार्गे दिवा डोंबिवली मेट्रो प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात समावेश केला आहे. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पाचा पाठपूरावा केला होता. 

मागील वर्षी या प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आले होते. त्यानंतर याचा आराखडा तयार करण्यात आला होता. वर्षावर मंगळवारी झालेल्या बैठकीदरम्यान पुन्हा या विषयांतर चर्चा झाली. या चोवीस किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचा विकास आराखडा तयार करण्याच्या सुचना केल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हा प्रकल्प तिसऱ्या टप्प्यात घेतला जाणार होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी या मेट्रो प्रकल्पाचा जातीने आढावा घेतल्यानंतर हा प्रकल्प प्राधान्याने पहिल्या टप्प्यात घेण्याच्या सचना केल्या आहेत. लवकरच या मेट्रो मार्गाचे काम सुरु होण्याची अपेक्षा आहे. या  प्रकल्पाचा तळोजा, दिवा, चौदा गावे, मुंब्रा कौसा, सत्तावीस गावे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरातील नागरिकांना यांचा लाभ होईल.