मुंबई विमानतळाबाहेर टॅक्‍सीचालकांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

मुंबई - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरच्या टॅक्‍सीचालकांनी शुक्रवारी आंदोलन केले. त्यामुळे विमानतळाबाहेर आल्यावर प्रवाशांना सामानासह पायपीट करावी लागली. विमानतळाबाहेरील पार्किंगची जागा मुंबई विमानतळ प्राधिकरण कमी करत असल्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर जवळपास एक हजार 800 टॅक्‍सी उभ्या असतात. ही प्रीपेड टॅक्‍सी सेवा आहे.

विमानतळाबाहेर तत्काळ टॅक्‍सी मिळत असल्याने प्रवाशांना अन्य ठिकाणी सहज पोचता येते. मात्र, शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून सर्व टॅक्‍सी संघटनांच्या टॅक्‍सीचालकांनी आंदोलन केले. आंदोलनाच्या वेळी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत टॅक्‍सी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. दोन ते तीन दिवसांत याबाबत निर्णय देऊ, असे आश्‍वासन विमानतळ प्राधिकरणाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.