मुंबईत पाच वर्षांत 32,852 लोकांचा टीबीने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबईत मानखुर्द येथे व्यक्तीचे सरासरी आयुर्मान 39 वर्ष इतके आहे.

मुंबई :  मुंबईकरांचे दिवसेंदिवस खालावत चालले असून मागील पाच वर्षांत मुंबईत 32 हजार 862 जणांचा क्षयरोगाने म्हणजेच टीबीने मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मुंबईतील नागरिकांचे सरासरी आर्युमान कमी होत आहे. याला कारणीभूत आहे. याचा विचार करायला हवा. 2016-17 मध्ये मुंबईत 50 हजार टीबी रुग्णाची नोंद झाली आहे. तर 2012-13 मध्ये डेंग्यूचे रूग्ण 4216 नोंदले गेले होते. तर  2016-17 मध्ये 17 हजार 771  इतके डेंग्यू रुग्ण नोंद झाली आहे. मुंबईत मानखुर्द येथे व्यक्तीचे सरासरी आयुर्मान 39 वर्ष इतके आहे. ही खेदाची बाब आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: