मुंबई घामाघूम! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

मुंबई - मॉन्सून कोकणासह मुंबईत पोहचल्याच्या बातमीने सुखावलेल्या मुंबईतील नागरिकांसाठी हा आनंद क्षणिक ठरला. चार दिवस कोरडेठाक गेले आहेत. कडक ऊन आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे रविवारीही (ता. 18) नागरिकांवर घामाच्या धारांनी भिजण्याची वेळ आली. हवामान विभागाकडून अंदाजांचा पाऊस पडला जात असून आता मंगळवारपर्यंत (ता. 20) संयम राखण्यास मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे. 

काही दिवस रात्री बरसून उकाड्यातून सुटका करणारा पाऊस आता दिवसाही गायब झाला आहे. हवामान विभागाने आता मंगळवारचा वायदा दिला आहे. त्यामुळे पावसाची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. रात्री पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात वातावरणात गारवा निर्माण झाला होता. आता चार दिवसांपासून पाऊस गायब असल्याने प्रचंड आर्द्रता वाढली आहे. कडक उन्हामुळे नागरिकांना घामाच्या धारांनी त्रस्त केले आहे. आकाशात एकही ढग दिसत नसून पावसाची कोणतीही चिन्हे नाहीत. रविवारही पावसाची वाट पाहण्यात गेल्याने सर्वांचाच हिरमोड झाल्याचे दिसून आले. जूनचा पंधरवडा उलटूनही पावसाचा मागमूस नसल्याने नागरिकांना मे महिना सुरू असल्याचा भास होत आहे. 

गेला पाऊस कुणीकडे? 
गेल्या आठवड्यात शनिवारी-सोमवारपर्यंत मुंबईसह उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर हवामान विभागाने हा अंदाज वर्तवण्यात आला होता; मात्र त्याच वेळी बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईतील पाऊस गायब झाला आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.