'अंगणवाडी'च्या मोर्चाला सेना, राष्ट्रवादीचा पाठींबा

अंगणवाडी
अंगणवाडी

मुरबाड (जिल्हा ठाणे) : संपकरी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मुरबाड येथील मोर्चात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एकत्रित येऊंन त्यानी संपाला पाठींबा तर दिलाच पण आशा कर्मचाऱ्यांनी त्यांस त्रास देऊ नये असे आवाहन केले

मुरबाड : मुरबाड येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला सत्ताधारी शिवसेने बरोबरच विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुद्धा पाठींब्स दिल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढले या नेत्यांनी आशा कर्मचाऱ्यांनी अंगणवाड्यामध्ये जाऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नये असे आवाहन केले. मंगळवारी ता 26  मुरबाड पंचायत समितीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती तर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला व सर्व महिलांनी पंचायत समिती कार्यालयाच्या दरवाजातच ठिय्या दिला.

तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरबाड तालुका अध्यक्ष रामचंद्र दळवी, शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष घरत,तालुका प्रमुख कांतीलाल कंटे ,उप तालुका प्रमुख संतोष विशे  मुरबाड शहर अध्यक्ष राम दुधाळे यांनी भाषणे करून संपाला पाठींबा दिला. मोर्चातील महिलांनी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचेवर टीकेची झोड उठवताना 'आली आली हो भागाबाई' या भारुडाच्या चालीवर गाणे गात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करताना कस काय पाटील बर आहे का काल काय ऐकलं ते खरे आहे का या लावणीचा आधार घेत टीका केली.

मोर्चाचे निवेदन स्वीकारणे साठी गट विकास अधिकारी एस ई ए हाश्मी सामोरे गेले व शासनाकडे आपले निवेदन पाठवतो असे आश्वासन दिले त्यानंतर शिष्टमंडळाने त्यांचे कार्यालयात जाऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्य सेविका रजिस्टर विकतात वेळच्या वेळी बिले मिळत नाहीत. मानधन पाच हजार रुपये असूनही ते कमी मिळते, अशा तक्रारी केल्या. मोर्चाचे नेतृत्व कृती समितीच्या तालुका अध्यक्ष छाया घरत, शहापूर तालुका अध्यक्ष अपर्णा पानसरे, राज्य संघटक सचिव भगवान दवणे, नांदेड जिल्हाध्यक्ष शततारका काटकडे, सांगली जिल्हा सचिव नादिरा नदाफ यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com