चोरीच्या मोबाईलची ऑनलाइन विक्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई - महिलांची पर्स लांबवून त्यातील मोबाईलची ऑनलाइन विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई - महिलांची पर्स लांबवून त्यातील मोबाईलची ऑनलाइन विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

रहिस बासू सय्यद ऊर्फ चुवा, नौशाद शेख आणि अकबर मन्सुरी अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. रहिस दुचाकीवरून रस्त्याने जाणाऱ्या महिलांची पर्स लांबवत असे; तर अकबर बनावट बिलाद्वारे चोरीचे मोबाईल ऑनलाइन विकत असे, असे पोलिसांनी सांगितले. रहिस आणि एक अल्पवयीन मुलगा रिक्षातील प्रवाशांच्या पर्स आणि मोबाईल चोरत असत. हे चोरीचे मोबाईल नौशाद आणि अकबरला रहिस देत असे. चोरीचे मोबाईल संकेतस्थळावर टाकल्यास पोलिस पकडतील म्हणून अकबर त्यांची बनावट बिले बनवून तीही संकेतस्थळावर टाकत असे, अशी माहिती समोर आली आहे.