पुलोत्सवाचे आज उद्घाटन; भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मुंबई : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त होणाऱ्या पुलोत्सवामध्ये यंदा गिरीजा देवी, विंदा करंदीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर, शिरीष पै यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये होणाऱ्या पुलोत्सवाचे उद्‌घाटन 8 नोव्हेंबरला सायंकाळी 5.30 वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीचे संचालक संजीव पलांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त होणाऱ्या पुलोत्सवामध्ये यंदा गिरीजा देवी, विंदा करंदीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर, शिरीष पै यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये होणाऱ्या पुलोत्सवाचे उद्‌घाटन 8 नोव्हेंबरला सायंकाळी 5.30 वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीचे संचालक संजीव पलांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. 8 ते 15 नोव्हेंबरदरम्यान या महोत्सवात साहित्य, चित्रकला, संगीत, नृत्य, चित्रपट, नाटक आदी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

योगेश सोमण दिग्दर्शित "श्‍यामपट' या मराठी नाटकाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गिरीजा देवी, पंडित जसराज व किशोरी आमोणकर यांच्या जीवनावरील "भिन्न षड्‌ज' हा लघुपट दाखवण्यात येणार आहे. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी गायलेल्या बंदिशी, गीते, अभंग आणि गझल यावर आधारित "सहेला' संगीत मैफल किशोरीताईंच्या शिष्य पंडित रघुनंदन पणशीकर, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे आणि तेजश्री आमोणकर सादर करणार आहेत. विंदांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त "विंदा-गोविंदा' हा कार्यक्रम प्रमोद पवार सादर करतील. हायकूकार शिरीष पै यांच्या हायकू आणि साहित्याचा वेध घेणारा "दुनिया अफाट आहे!' हा कार्यक्रम श्रीनिवास नार्वेकर सादर करतील.

चित्रप्रेमींसाठी "नदी वाहते आहे', "कासव' हे चित्रपट या महोत्सवात पाहावयास मिळतील; तर नाट्यप्रेमींसाठी "व्यक्ती आणि वल्ली', "बुद्ध हसला', "छोट्यासाठी वयं मोटम्‌ खोटम्‌' ही नाटके पाहायला मिळतील. लोककलेत दानपट्टा, गोंध, गजनृत्य आणि मेघा घाडगे यांचा महिला शक्तीवर आधारित काटा-कीर कार्यक्रम सादर होईल. "स्वर अक्षर मिलाफ' या विशेष कार्यक्रमात बासरी आणि व्हायोलिनच्या जुगलबंदीबरोबर सुलेखनाचा मिलाफ पाहावयास मिळणार आहे. यामध्ये यज्ञेश रायकर, एस. आकाश आणि अच्युत पालव आदींचा सहभाग असेल.

पुलंच्या साहित्यावर कार्यक्रम
13 नोव्हेंबरला "आठवणीतले पुल' कार्यक्रमात पु. ल. यांचे साहित्य दृक्‌श्राव्य माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. 15 नोव्हेंबरला पुलंच्या साहित्य, संगीत आणि चित्रपट कृतींवर आधारित (वि)पुल रंग कार्यक्रम नारायण जाधव सादर करणार आहेत. अकादमीच्या कलादालनात पुलंवरील चित्रे, ऑडिओ व्हिज्युअल्स, साहित्य प्रदर्शित करण्यात येणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news today inauguration of Pulotsav