शौचालयाचे अनुदान  लाटणाऱ्यांवर गुन्हे

शौचालयाचे अनुदान  लाटणाऱ्यांवर गुन्हे

तुर्भे - हागणदारीमुक्त नवी मुंबई शहर या मोहिमेत शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये वर्षभरात घरगुती शौचालये बांधण्याचे लक्ष्य महापालिकेला गाठता आले नाही. यात अनेकांनी पहिल्या टप्प्याचे अनुदान घेतले; परंतु शौचालय बांधले नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या लाभार्थींना १५ डिसेंबरपर्यंत शौचालय बांधण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर पालिका व केंद्र सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 

पालिकेने या योजनेसाठी एक कोटींची तरतूद केली आहे. शौचालय बांधण्यासाठी केंद्राकडून चार हजार, राज्य सरकारकडून आठ हजार आणि पालिकेकडून पाच हजार अनुदान दोन टप्प्यांत दिले जाते. असे एकूण १७ हजारांचे अनुदान शौचालय बांधण्यासाठी दिले जाते. मात्र परिमंडळ एक व दोनमधील अनेक लाभार्थींनी पालिका व सरकारकडून अनुदान घेतले; परंतु शौचालय बांधलेले नाही. त्यामुळे त्यांनी १५ डिसेंबरपर्यंत शौचालय बांधले नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. परिमंडळ एकमध्ये तुर्भे परिसरातील १३ जणांनी अनुदान घेऊन अद्याप शौचालय बांधले नसल्याचे समोर आल्याने उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी त्यांना गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com