टोमॅटोचा भाव घसरण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नवी मुंबई - गेल्या महिनाभरापासून वाढलेले टोमॅटोचे दर आता हळूहळू खाली उतरण्यास सुरवात झाली आहे. वाशीतील घाऊक बाजारात 80 रुपये किलो झालेला टोमॅटो आता 40 ते 50 रुपयांपर्यंत खाली घसरला आहे.

नवी मुंबई - गेल्या महिनाभरापासून वाढलेले टोमॅटोचे दर आता हळूहळू खाली उतरण्यास सुरवात झाली आहे. वाशीतील घाऊक बाजारात 80 रुपये किलो झालेला टोमॅटो आता 40 ते 50 रुपयांपर्यंत खाली घसरला आहे.

त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 60 ते 70 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. यापूर्वी किरकोळ बाजारात टोमॅटो शंभरीपार गेला होता. मुंबईला दररोज 60 ते 70 गाड्या टोमॅटोची गरज आहे. मात्र, जुलैमध्ये केवळ तीस ते चाळीस गाड्या टोमॅटो येत होता. त्यात बंगळूर व साताऱ्यातील मालाचा समावेश होता. मात्र, आता बंगळूरमधून मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्याने बाजार काही प्रमाणात सावरला आहे.