कासवांची तस्करी करणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

मुंबई - स्टार प्रजातीच्या कासवांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाच्या (डब्ल्यूसीसीबी); तसेच वनविभागाच्या पथकाने सोमवारी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली. एस. विजय (वय 27), शागिराम (25) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे डब्ल्यूसीसीबी आणि वनविभागाने सापळा रचून दोघांना अटक केली. दरम्यान, स्टार प्रजातीच्या कासवांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. त्यांची पाच ते दहा हजार रुपयांना विक्री होते. या प्रजातीची कासवे घरात ठेवल्यास लक्ष्मी नांदते, या अंधश्रद्धेतून अनेकजण ते विकत घेतात, अशी माहिती ठाण्यातील प्राणिमित्र पवन शर्मा यांनी दिली.