मुंबईतील वाहतुकीची स्थिती मोबाईलवर दाखवा - माथूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मुंबई - सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे राज्य अधिक सुरक्षित झाले आहे. नागरिकांना मुंबईसारख्या शहरातील वाहतुकीची स्थिती मोबाईलवर पाहता येईल, अशी यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. ही सशुल्क सेवा सुरू करावी, अशी सूचना राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी येथे केली.

"शहरे सुरक्षित करण्यामधील व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टीमची भूमिका' या विषयावर वरळी येथे शुक्रवारी झालेल्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की शहरातील पादचाऱ्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी ठिकठिकाणी सब-वे असण्याची गरज आहे. चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवतात. यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी होते. चालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. काही ठिकाणी शाळांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.