हुक्का पार्लरमध्ये तरुणावर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

उल्हासनगर - उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोस हुक्का पार्लर चालवणाऱ्याने सहाकाऱ्यांच्या मदतीने तरुणावर प्राणघातक हल्ला केला. शनिवारी (ता. 3) ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली. शहरातील कॅम्प क्रमांक तीनमधील शांतीनगर परिसरात स्मशानभूमीजवळ बिट्टू हाउस नावाची इमारत आहे. तेथील दुसऱ्या मजल्यावर हितेश इसराणी हुक्का पार्लर चालवतो. तेथे अल्पवयीन मुले-मुलीही जातात. शनिवारी दुपारी शांतीनगर येथील समीर ठाकूर (वय 17) मित्र असिम खान याच्यासोबत तेथे गेला होता. त्या वेळी हितेशने "इथे कशाला आला', असे विचारून समीरशी वाद घातला. या वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली.

उल्हासनगर - उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोस हुक्का पार्लर चालवणाऱ्याने सहाकाऱ्यांच्या मदतीने तरुणावर प्राणघातक हल्ला केला. शनिवारी (ता. 3) ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली. शहरातील कॅम्प क्रमांक तीनमधील शांतीनगर परिसरात स्मशानभूमीजवळ बिट्टू हाउस नावाची इमारत आहे. तेथील दुसऱ्या मजल्यावर हितेश इसराणी हुक्का पार्लर चालवतो. तेथे अल्पवयीन मुले-मुलीही जातात. शनिवारी दुपारी शांतीनगर येथील समीर ठाकूर (वय 17) मित्र असिम खान याच्यासोबत तेथे गेला होता. त्या वेळी हितेशने "इथे कशाला आला', असे विचारून समीरशी वाद घातला. या वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. हितेशने सहकारी धीरज पंजाबी, संजय दिवाण, वैभव ऊर्फ गोट्या बागूल यांच्या मदतीने समीरवर बांबूने हल्ला केला. त्यानंतर धारदार चाकूने समीरच्या गळ्यावर आणि पोटावर वार केला. या वेळी असिमलाही मारहाण केल्याने तो किरकोळ जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या समीरला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

टॅग्स

मुंबई

नवी मुंबई  - भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी दुपारपासून नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली...

08.09 PM

मुंबईः विजांच्या कडकाडाटासह सुरू झालेल्या पावसाने 29 जुलैची मुंबईकरांना आठवण करून दिली. शहरात 28.71 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 28.93...

06.36 PM

ठाणे: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल इब्राहीम कासकर याने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना फोन करून...

04.24 PM