'कुलगुरु तुझा आमच्यावर भरोसा नाय काय?'

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 13 जुलै 2017

आंबेडकर स्टूडेंट असोसिएशन, मुंबई या विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी बुद्ध भूषण कांबळे,सचिन मनवाडकर आणि रोहित कांबळे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारा मुळे वेळेत परीक्षा पेपर न मिळणे,वेळेत उत्तर पत्रिका तपासून न होणे त्या मुळे पदवी निकालां संबंधित होणारा उशीर आणि त्या मुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान या सर्व गोष्टिंना कुलगुरुंना  जबाबदार धरले आहे.

मुंबादेवी - कलिनास्थित मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध विद्यार्थी संघटनांनी रोष व्यक्त करीत "कुलगुरु तुझा आमच्यावर भरोसा नाय का ? "या शब्द बोलांची व्यंगात्मक समूह गिताची चित्रफीत सादर केली.

आंबेडकर स्टूडेंट असोसिएशन, मुंबई या विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी बुद्ध भूषण कांबळे,सचिन मनवाडकर आणि रोहित कांबळे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारा मुळे वेळेत परीक्षा पेपर न मिळणे,वेळेत उत्तर पत्रिका तपासून न होणे त्या मुळे पदवी निकालां संबंधित होणारा उशीर आणि त्या मुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान या सर्व गोष्टिंना कुलगुरुंना  जबाबदार धरले आहे.

मुंबई विद्यापिठात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मुला मुलींना मोफत शिक्षण आणि वसती गृहात राहण्याची मोफत सोय व्हावी.येथील वैद्यकीय सुविधात वाढ होऊंन 24x7 अशी वैद्यकीय सेवा तात्काळ सुरु करण्यात यावी.नियमित आपली विद्यापीठाशी संबंधित कामकाजा साठी मुंबई आणि बाहेर गावाहुंन येथे जवळपास दहा हजार लोक येत असतात. त्यात विद्यापीठ आवारात असणारे विद्यार्थी आणि संबंधित कर्मचारी यांना तात्काळ वैदयकीय मदत उपलब्ध व्हावी म्हणून रुग्ण वाहिका तैनात करण्यात यावी.त्याच बरोबर विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्याना शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी.जी वेळेत दिली जात नाही.या विविध मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारा विरुद्ध विद्यार्थी संघटनांचा यल्गार सुरु होऊंन आम्ही आंदोलन करू असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: