वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचा समावेश असून, हा सागरी प्रकल्प 7 हजार 502 कोटींचा आहे.

मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेची क्षमता वाढविणे, वांद्रे-वरळी सीलिंकच्या पूर्ण केलेल्या कामाच्या खर्चापोटी 328 कोटींचा अतिरिक्त निधी देणे, ठाण्यात नव्याने बांधावयाच्या 775 कोटींच्या क्रिक ब्रिजला मंजुरी देणे, ठाणे-घोडबंदर रस्ता सहापदरी करण्यासाठी 667 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देणे, भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्ता सहापदरी करण्यासाठी 389 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी देणे आणि बारामती एकात्मिक रस्तेविकास योजनेच्या कामाचा झालेला खर्च रस्तेविकास महामंडळास देण्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, दीपक सावंत, जयकुमार रावल, मुख्य सचिव सुमित मल्लिक आदी उपस्थित होते.

मुंबई

मुंबई - मुंबईला मंगळवारी (ता.20) रात्रीपर्यंत तुफानी हिसका दाखवणाऱ्या पावसाने बुधवारीही मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड...

06.03 AM

नवी मुंबई -  महापालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा "जोरात' जाणार असून, स्थायी समितीपाठोपाठ...

03.12 AM

नवी मुंबई - राज्यात या वेळी चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पदनात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न...

02.39 AM