वाशीत उद्या ‘फॅशन शो’

वाशीत उद्या ‘फॅशन शो’

नवी मुंबई - ‘मिस्टीक २०१७ तिसरा फॅशन शो’ महोत्सव वाशीत शनिवारी (ता. १८) सुरू होणार आहे. प्रसिद्ध डिझायनर आणि स्टायलिस्ट जुवेरिया नुसरत यांच्या माध्यमातून हा ‘फॅशन शो’ आयोजित करण्यात आला आहे. नुसरत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नवीन आऊट फिट्‌स या वेळी सादर करण्यात येणार आहेत. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी वाशीतील फोर पॉईंट हॉटेलमध्ये या ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले असून फॅशन जगतातील मान्यवर व दिग्गज कलाकार या शोला उपस्थित राहणार आहेत. 

जुवेरिया नुसरत हे फॅशन जगतातील प्रसिद्ध नाव असून सामाजिक बांधिलकी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ला मोहिमेला पाठिंबा दिला आहे. दोन वर्षांपासून नुसरत यांच्या माध्यमातून ‘फॅशन शो’ आयोजित केला जात आहे. 

यंदा त्यांच्या फॅशन शोचे तिसरे वर्ष असून स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत फॅशन शोचे आयोजन करण्यात येणार आहे. वाशीत होणाऱ्या फॅशन शोमध्ये विवाहित महिला नवीन डिझाईनचे कपडे परिधान करून रॅम्प वॉक करताना दिसणार आहेत. तंदुरुस्ती व संतुलित आहार या संकल्पनेवर हा फॅशन शो आधारित आहे. या वेळी महिलांना स्वतःच्या सौंदर्याची काळजी कशी घ्यावी व आहार कसा असावा, याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. ही स्पर्धा नसून यात सहभागी झालेल्या महिला स्वतःच्या गुणवत्तेचे निरीक्षण करून आत्मविश्‍वास वाढवू शकणार आहेत. स्त्रियांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रिलॉन्च पार्टी, वृद्धाश्रमात भेट, आरोग्यदायी स्वयंपाक कार्यशाळा, सुशोभीकरणाबाबत माहिती देणारी कार्यशाळा, मोफत आरोग्य तपासणी, कॅटवॉक ट्रेनिंग असे अनेक प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. 

कुटुंब व संस्कृती
लग्नानंतर महिलांच्या आयुष्यात अनेक बदल होतात. नवीन कुटुंबांना आपलसे करणे, नवीन संस्कृती आत्मसात करणे, स्वतःसोबत कुटुंबाची काळजी घेणे अशा अनेक बाबींमध्ये व्यस्त होणाऱ्या महिलांना ‘मिस्टीक फॅशन शो’ एक व्यासपीठ तयार करून देत आहे. या फॅशन शोमध्ये प्रसिद्ध व्यक्ती, सिनेजगतातील सेलिब्रेटीज, अभिनेते व अभिनेत्री यांच्यासह एफएम रेडिओवरचे आरजे अनुराग पांडे शोचे होस्ट उपस्थित असणार आहेत. बॉलीवूडचे अभिनेते एजाज खान या शोचे शोस्टॉपर असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com