पाणी विकत घेऊन भागवली जाते तहान!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

खारघर - खारघर वसाहतीत काही दिवसांपासून अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे सिडकोने नियमित पुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्यास खारघरमध्ये पाणीप्रश्‍न पेटण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. सिडको वसाहतीत हेटवणे धरणातून पुरवठा केला जातो. धरण तुडुंब भरले असतानाही अपुऱ्या पुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपासून कमी दाबाने पुरवठा होत असल्याने सेक्‍टर ४मध्ये विशेष कार्यकारी अधिकारी नाना घरत आणि सेक्‍टर १९ मधील वसाहतीतील नागरिकांसह बिना गोगरी यांनी खारघर येथील सिडकोच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.

खारघर - खारघर वसाहतीत काही दिवसांपासून अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे सिडकोने नियमित पुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्यास खारघरमध्ये पाणीप्रश्‍न पेटण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. सिडको वसाहतीत हेटवणे धरणातून पुरवठा केला जातो. धरण तुडुंब भरले असतानाही अपुऱ्या पुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपासून कमी दाबाने पुरवठा होत असल्याने सेक्‍टर ४मध्ये विशेष कार्यकारी अधिकारी नाना घरत आणि सेक्‍टर १९ मधील वसाहतीतील नागरिकांसह बिना गोगरी यांनी खारघर येथील सिडकोच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.  पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सिडको अधिकाऱ्यांसोबत पालिकेच्या खारघर येथील विभाग कार्यालयात बैठक घेतली होती; मात्र अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. 

सिडकोकडून सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत पाणी सोडले जात असल्याचे सांगितले जाते; मात्र अधिकारी खोटे बोलत आहेत. माझ्या सोसायटीत सायंकाळी ५ नंतर पाणीपुरवठा बंद होतो. 
- केशरी पाटील, जिल्हा चिटणीस, मनसे

Web Title: mumbai news water

टॅग्स