मुंबईत आज जोरदार पाऊस? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने सोमवारी (ता. 18) मुसळधार कोसळेल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने रविवारी (ता. 17) दिला. 

मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात कोसळणारा पाऊस सोमवारी मुंबई परिसरात दाखल होईल. कोकण ते केरळ किनारपट्टीपर्यंत पावसासाठी आवश्‍यक द्रोणीय स्थिती (ऑफ शोअर ट्रफ (off shore trough) निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. सौराष्ट्रात हवेच्या वरच्या थरांत चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने उत्तर कोकणातही पाऊस पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रावरही पावसाची कृपादृष्टी होईल, असे वेधशाळेने म्हटले आहे. 