सिग्नल बिघाडामुळे पश्‍चिम रेल्वे विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई - पश्‍चिम रेल्वे मार्गावर गुरुवारी पहाटे 5.30 वाजता सिग्नलमध्ये दोन वेळा बिघाड झाल्याने लोकलच्या 25 फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर 75 फेऱ्या उशिराने धावल्या.

मुंबई - पश्‍चिम रेल्वे मार्गावर गुरुवारी पहाटे 5.30 वाजता सिग्नलमध्ये दोन वेळा बिघाड झाल्याने लोकलच्या 25 फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर 75 फेऱ्या उशिराने धावल्या.

माहीम स्थानकाजवळ पहाटे 5.30 वाजता दोन्ही मार्गांवरील सिग्नलमध्ये बिघाड झाला, त्यामुळे लोकलचा वेग मंदावला. सुमारे 20 मिनिटांत बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर 7.30 वाजता विरार येथेही सिग्नलमध्ये बिघाड झाला. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. विरारपासून ते अंधेरीदरम्यानच्या प्रवासात प्रवाशांना यामुळे त्रास सहन करावा लागला.